वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास; नागपूरहून परतल्यावर चोरीचा प्रकार उघड.

वरोऱ्यात बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास; नागपूरहून परतल्यावर चोरीचा प्रकार उघड.

वरोरा, दि. 29 जून 2026 :
वरोरा शहरातील गिरीपुंजे कॉलनी, आनंदवन चौक परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹3 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा सेवकराम बांगडकर (वय 47) या गिरीपुंजे कॉलनी, देशपांडे पेट्रोल पंपासमोर, आनंदवन चौक येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे पती सेवकराम बांगडकर हे आनंदवन अंध विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दि. 27 जून रोजी दुपारी 2 वाजता उषा बांगडकर या पतीसह नागपूर येथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. दि. 28 जून रोजी रात्री सुमारे 8.15 वाजता त्या वरोऱ्यात परतल्यानंतर घरी आल्या असता मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. शेजारी राहणारे विजय खरशे यांना बोलावून घरात प्रवेश केला असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाट उघडून त्यातील ड्रॉवर बाहेर काढलेले आढळले.
तपासणी केली असता कपाटात ठेवलेली ₹1.50 लाखांची रोख रक्कम, 2 तोळ्यांची सोन्याची पोत (अंदाजे ₹1.20 लाख), 5 ग्रॅमचे सोन्याचे कानातील टाप्स (अंदाजे ₹30 हजार), 3 ग्रॅमचे सोन्याचे डोरले (अंदाजे ₹45 हजार) तसेच 5 तोळ्यांची चांदीची पिंड (अंदाजे ₹5 हजार) असा एकूण ₹3.50 लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments