वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात दिवसाढवळ्या ४ लाखांची धाडसी चोरी; कारची काच फोडून रोख रक्कम लंपास

वरोऱ्यात दिवसाढवळ्या ४ लाखांची धाडसी चोरी; कारची काच फोडून रोख रक्कम लंपास

वरोरा : शहरातील साकार नगर लेआऊट परिसरात सोमवारी (२२ जून) दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाची काच फोडून तब्बल ४ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साकारनगर येथील रहिवासी व व्यावसायिक सुधाकर तुळशीराम रोहनकर (वय ५०) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहनकर यांचा नंदोरी येथे गिट्टी क्रशरचा व्यवसाय असून सोमवारी सकाळी त्यांनी मेहर ट्रेडिंग कंपनीकडून २ लाख रुपये घेतले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, यात्रा वॉर्ड शाखेतून आणखी ७ लाख रुपये काढले. अशा प्रकारे एकूण ९ लाख रुपये त्यांच्या ताब्यात होते.
यापैकी ५ लाख रुपये घेऊन ते मित्रासोबत चंद्रपूरला रवाना झाले. उर्वरित ४ लाख रुपये खाकी रंगाच्या पिशवीत ठेवून रेणाल्ट कॅप्चर (MH-34 BG-9494) या वाहनाच्या मागील सीटखाली ठेवले होते. वाहन कार्यालयासमोर लॉक करून ते निघून गेले.
दरम्यान दुपारी सुमारे १.३० वाजता त्यांच्या मुलाने फोन करून वाहनाच्या मागील बाजूची काच फुटल्याची माहिती दिली. व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केली असता रोख रक्कम असलेली पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले. संध्याकाळी परतल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
....

Comments