वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात भव्य 'सामान्य ज्ञान परीक्षा' स्पर्धेचे आयोजन*

*दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात भव्य 'सामान्य ज्ञान परीक्षा' स्पर्धेचे आयोजन*

वरोरा: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'भाऊंचा वारसा' यांच्या वतीने वरोरा येथे भव्य 'सामान्य ज्ञान परीक्षा' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे पार पडणार आहे. या परीक्षेसाठी ६ ते १६ वर्ष वयोगटातील मुले व मुली पात्र असून, स्पर्धा पूर्णपणे मोफत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना शनिवार, २७ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करता येईल.

या सामान्य ज्ञान परीक्षेचे स्वरूप ६० मिनिटांचे आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीचे असेल, ज्यामध्ये एकूण ६० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. यामध्ये स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर आधारित ३० प्रश्न आणि जनरल नॉलेजवर आधारित ३० प्रश्न असतील. विशेष म्हणजे या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुण पद्धती  ठेवण्यात आलेली नाही. परीक्षार्थींनी येताना आपले वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असून, वयोमर्यादेची खोटी माहिती दिल्यास अपात्र ठरवले जाईल.

स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांकडून भव्य रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला २१,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला ११,००० रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय परीक्षेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थीला कौतुक म्हणून प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता 'धानोरकर जनसंपर्क कार्यालय, वरोरा' येथे आयोजित करण्यात आला आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी वरोरा परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी ८३२९६४७४२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Post a Comment