वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

सोन्याची चैन स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक; वरोऱ्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

  हळद-पाण्याच्या प्रयोगात गायब झाला गोफ;

सोन्याची चैन स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक; वरोऱ्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

चेतन लूतडे ३/६/२०२६
वरोरा : शहरातील सरदार पटेल वॉर्ड, महाबँक कॉलनी परिसरात एका निवृत्त नागरिकाची सोन्याची चैन स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात व्यक्तींनी सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना 2 जून रोजी घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नथ्थु साधोजी दडमल (वय 62) हे आपल्या घरी पत्नीसमवेत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी चांदी, तांबे व पितळी भांडी स्वच्छ करण्याचे पावडर दाखवून काही वस्तू स्वच्छ करून दाखवल्या. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसला.
यानंतर तक्रारदारांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (गोप) स्वच्छ करून नवीनसारखी करून देण्याचे आश्वासन देत ती चैन त्यांनी घेतली. हळद व पाणी टाकलेल्या एका स्टीलच्या डब्यात चैन ठेवून तो डबा गॅसवर ठेवण्यात आला. त्यानंतर "रजिस्टर घेऊन येतो" असे सांगून दोघेही निघून गेले.
काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ते परत न आल्याने तक्रारदारांनी डबा उघडून पाहिला असता त्यामधील सोन्याची चैन गायब असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 318(4) (फसवणूक) व 3(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक 0721/2026 नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Tob News warora 
.........

Comments