वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भरधाव दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 भरधाव दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. 27 जून 2026

वरोरा तालुक्यातील मांगली (देवतळे) येथील एका दुर्दैवी अपघातात  युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 25) सायंकाळी घडली. या प्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगली (देवतळे) येथील साहील आत्राम हा त्याचा मित्र पियूष शिरणकर याच्यासोबत त्याच्या हिरो फॅशन प्रो (क्र. MH-34-CG-0279) या दुचाकीने टेमुर्डा येथे बाजार करण्यासाठी गेला होता. बाजार करून दोघेही सायंकाळी सुमारे 7.30 वाजता परत येत असताना चिंचाळा फाटा परिसरात भरधाव वेगामुळे दुचाकीचा ताबा सुटून ती घसरली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातात साहील आत्राम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेबाबत मृताचा मामा देवराव मधुकर पराते (वय 47, रा. मांगली-देवतळे) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून दुचाकी चालक पियूष शिरणकर याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरोरा पोलिसांनी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ताहरी सुरेश जाधव करीत आहेत.

Comments