वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

रत्नमाला चौकात किरकोळ वादातून मारहाण; ट्रॅव्हल्सच्या कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल.

रत्नमाला चौकात किरकोळ वादातून मारहाण; ट्रॅव्हल्सच्या कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा : शहरातील रत्नमाला चौक परिसरात किरकोळ वादातून ट्रॅव्हल्सच्या कंडक्टरने एका मजुराच्या डोक्यात स्टीलच्या कड्याने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 24 जून) सायंकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारासिंग हिरा बदखल (वय 35, रा. वडार मोहल्ला, वरोरा) हे आपल्या मित्रांसह रत्नमाला चौकातील एका चहाच्या दुकानात गेले होते. चहा पिऊन बाहेर पडत असताना तेथे उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH-40-Y-6863 चा कंडक्टर प्रवाशांना बोलावत होता. यावेळी दारासिंग यांच्या मित्राने एका ठिकाणाचे नाव घेतल्याने कंडक्टर व त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर संबंधित कंडक्टरने दारासिंग बदखल यांना शिवीगाळ करत हातातील स्टीलच्या कड्याने डोक्यावर प्रहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात दारासिंग यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर मित्रांनी आरोपीची विचारपूस केली असता त्याने स्वतःचे नाव अभिषेक भलमे (रा. चारगाव) असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे तक्रारदाराच्या मनात भीती निर्माण झाल्याने त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी एफआयआर क्रमांक 0765/2026 अंतर्गत आरोपी अभिषेक भलमे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 118(1), 351(2) व 352 अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments