वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अकरावीच्या वर्गांवर शिक्षण विभागाची करडी नजर; गैरहजर विद्यार्थी आढळल्यास कॉलेज अडचणीत

अकरावीच्या वर्गांवर शिक्षण विभागाची करडी नजर; गैरहजर विद्यार्थी आढळल्यास कॉलेज अडचणीत

 प्रतिनिधी : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर अकरावीच्या वर्गांची अचानक तपासणी केली जाणार असून, विद्यार्थी नियमितपणे वर्गात उपस्थित नसल्याचे आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. गंभीर अनियमितता आढळल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला जाऊ शकतो.
काय आहे पार्श्वभूमी?

राज्यातील अनेक ठिकाणी काही कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी शिकवणी संस्था यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांचे केवळ महाविद्यालयात नाव नोंदवून त्यांना पूर्णवेळ खासगी क्लासेसमध्ये शिक्षण दिले जाते, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होती. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे.

यावर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती पडताळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बायोमेट्रिक हजेरी, वर्ग तपासणी आणि अचानक भेटी यांचा वापर केला जाणार आहे.
अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपस्थिती यातील तफावत बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करून,
नियमित अध्यापन सुरू आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशानुसार आणि शिक्षण संचालकांच्या परिपत्रकानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली जाणार आहे. वर्गात विद्यार्थी उपस्थित नसल्यास संबंधित संस्थेला नोटीस बजावली जाईल. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यास मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे ‘डमी अॅडमिशन’ आणि केवळ कागदोपत्री सुरू असलेल्या वर्गांवर आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेत सहभाग वाढून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

Comments