वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बिअर शॉपीत दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग; तरुणाचा चाकू हल्ला, जीवे मारण्याची धमकी

बिअर शॉपीत दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग; तरुणाचा चाकू हल्ला, जीवे मारण्याची धमकी

वरोरा : बिअर शॉपीमध्ये बसून मद्यपान करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दुकान मालकावर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वरोरा शहरात घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्री १०.२० ते १०.३० वाजताच्या सुमारास आनंदवन चौक परिसरातील पंकज बिअर शॉपी येथे ही घटना घडली. दुकानाचे मालक पंकज पुंडलीक पुंजरवार (वय ४९) व त्यांचे व्यवस्थापक रोहित मनोज नकवे हे दुकानात उपस्थित होते.
त्यावेळी युवक हा आपल्या एका साथीदारासह दुकानात आला. दोघांनी बिअर खरेदी करून दुकानातच बसून मद्यपान करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान बंद करण्याची वेळ झाल्याने पंकज पुंजरवार यांनी त्यांना तसे करण्यास मज्जाव केला.
याचा राग आल्याने आरोपी काही वेळाने हातात चाकू घेऊन दुकानासमोर आले. त्यांनी व्यवस्थापक रोहित नकवे यांच्याकडे धाव घेतल्याने त्यांना सुरक्षितपणे दुकानात पाठवून शटर बंद करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी पंकज पुंजरवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने  चाकूने पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकज पुंजरवार यांनी वार चुकवल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.या
घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. 

सदर गुन्ह्याची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात २ जून रोजी रात्री ११.१९ वाजता करण्यात आली.
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून वरोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंद केला असून वरोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Comments