वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

पतीला मारहाण व पत्नीला शिवीगाळ; आरोपीविरोधात वरोरा पोलिसांत तक्रार

पतीला मारहाण व पत्नीला शिवीगाळ; आरोपीविरोधात वरोरा पोलिसांत तक्रार

वरोरा : तालुक्यातील मोठा मझरा येथील एका महिलेने आपल्या पतीला मारहाण करून स्वतःलाही शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गावातील व्यक्तीविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार कविता गजानन चांदोकर (वय ३२) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती गजानन चांदोकर हे १८ जून रोजी कामावरून घरी परतल्यानंतर गावातील सत्यपाल चांदोकर याने त्यांच्याशी वाद घालत काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत गजानन चांदोकर यांच्या पायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच १९ जून रोजी सकाळी सत्यपाल चांदोकर हा तक्रारदाराच्या घरी आला. यावेळी त्याने अश्लील शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमी गजानन चांदोकर यांनी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments