वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बुकिंगनंतरही ८ दिवस सिलिंडर नाही; जाब विचारणाऱ्या ग्राहकाला उद्धट वागणूक.वरोऱ्यात स्नेहा गॅस एजन्सीवर ग्राहकांची पिळवणूक केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे तक्रार.

बुकिंगनंतरही ८ दिवस सिलिंडर नाही; जाब विचारणाऱ्या ग्राहकाला उद्धट वागणूक.

वरोऱ्यात स्नेहा गॅस एजन्सीवर ग्राहकांची पिळवणूक केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे तक्रार.

वरोरा : शहरातील स्नेहा गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडर वितरणातील विलंब, ग्राहकांशी उद्धट वागणूक आणि अतिरिक्त रकमेची मागणी केल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, वरोरा येथील रहिवासी सोनारकर यांनी २ जून २०२६ रोजी घरगुती गॅस सिलिंडरसाठी बुकिंग केले होते. बुकिंगनंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी तसेच बिल जनरेट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र, तब्बल आठ दिवस उलटूनही सिलिंडर घरपोच न मिळाल्याने त्यांनी थेट एजन्सी कार्यालयात जाऊन चौकशी केली.
यावेळी एजन्सीकडून त्यांची बुकिंग रद्द झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती विचारल्यानंतर एजन्सीचे मालक व कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोप सोनारकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने वरोरा तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या घरी सिलिंडर पाठविण्यात आला. मात्र, सिलिंडर पोहोचल्यानंतर बिलाव्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ग्राहकाने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वितरणासाठी आणलेला सिलिंडर परत नेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर पुरवठा निरीक्षक गवई यांनी या प्रकरणाची दखल घेत एजन्सी व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर दुसऱ्या दिवशी ग्राहकाच्या घरी सिलिंडर पोहोचविण्यात आला आणि अधिकृत बिलानुसारच रक्कम स्वीकारण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित ग्राहकाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. गॅस वितरणातील अनियमितता, ग्राहकांना दिली जाणारी वागणूक आणि कथित मनमानी कारभार याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments