वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

एसटी बसच्या धडकेत दुभती म्हैस ठार; शेतकऱ्याचे १.२० लाखांचे नुकसान

एसटी बसच्या धडकेत दुभती म्हैस ठार; शेतकऱ्याचे १.२० लाखांचे नुकसान

वरोरा, दि. 22 जून : वरोरा तालुक्यातील कुष्णा गावाजवळ एसटी बसच्या धडकेत एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात शेतकरी भास्कर महादेव चोपणे यांचे अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित बस चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  कुष्णा येथील रहिवासी भास्कर चोपणे हे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्या मालकीच्या सात म्हशींपैकी पाच म्हशींना ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी चरायला सोडले होते. सायंकाळी चार म्हशी परत आल्याने उर्वरित म्हशीचा शोध सुरू असताना गावातील एका नागरिकाने त्यांना फोन करून शेंबळ टोल नाक्याजवळ एसटी बसच्या धडकेत म्हैस मृत झाल्याची माहिती दिली.
घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, चोपणे यांची सुमारे आठ वर्षांची दुभती काळ्या रंगाची म्हैस मृतावस्थेत आढळून आली. मृत म्हशीची किंमत अंदाजे १.२० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, एमएच 49 बीझेड 4663 क्रमांकाच्या एसटी बसच्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून म्हशीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 19 तारखेला वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments