वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा मोहक चवले राज्यात अव्वल; १०० पर्सेंटाइलसह घवघवीत यश.

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा मोहक चवले राज्यात अव्वल; १०० पर्सेंटाइलसह घवघवीत यश

वरोरा : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) मार्फत घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग, कृषी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वरोरा येथील एक्सलंट अकॅडमीचा विद्यार्थी मोहक संदीप चवले याने १०० पर्सेंटाइल गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
यावर्षी राज्यभरातून केवळ १२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवण्याची किमया साधली असून, त्यामध्ये मोहक चवलेचा समावेश आहे. त्याच्या या यशामुळे वरोरा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक्सलंट अकॅडमीच्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निशांत संगीत नवघरे याने ९९.९४, मनन संगीत मोदी याने ९९.१९, तर नील राजेश माथनकर याने ९८.८५ पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत.
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

तसेच सायली धनराज रेवतकर (९७.८५), ईशांत रमाकांत ठावरे (९७.८२), कृष्णा रवींद्र देसाई (९७.४४), क्रितिका दिवाकर मोडक (९६.५५) आणि दिपाली पुरुषोत्तम बावनकर (९५.३३) यांनीही उत्कृष्ट यश मिळवून अकॅडमीच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे.

नर्सिंग प्रवेश परीक्षेतही अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. आस्था जगन्नाथ रंदई हिने ९६.७८ तर आराधना रामानंद प्रजापती हिने ९५.९८ पर्सेंटाइल मिळवत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल एक्सलंट अकॅडमीचे संस्थापक प्रा. अभय टोंगे, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


एक्सलंट अकॅडमीच्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले .

1.मोहक संदीप चवले  - 100 % tile
2.निशांत संगीत नवघरे - 99.94%tile
3. मनन संगीत मोदी - 99.19%tile
4. निल राजेश माथनकर - 98.85%tile
5. सायली धनराज  रेवतकर - 97.88 % tile
6. इशांत रमाकांत ठावरी - 97.82 % tile
7. कृष्णा रवींद्र देसाई - 97.44 %tile
8. क्रितिका दिवाकर मोडक - 96.55 % तिले
9. दीपाली पुरषोत्तम पावनकर - 95.32 %tile
9. हर्षल गणेश कुंभारे - 94.66 %tile 
10. गायत्री दीपक वाढंरे - 94.39 %tile
11. रोहित श्रीराम देठे - 94.30 % tile
12. इफराखाणम बशीरखा पठाण - 91.40 % tile
13. आस्था जगन्नाथ रंदई - 90.70
14. काजोल पंकज बोरा 90.24
15. कशिश संतोष गोबाडे 90.13
 16.आराधना रामानंद प्रजापती 90.06
Nursing
1.आस्था जगन्नाथ रंदई -96.78
2.आराधना रामानंद प्रजापती-95.98

Comments