वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात घरातून अवैध देशी दारूचा साठा जप्त; महिलेविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

वरोऱ्यात घरातून अवैध देशी दारूचा साठा जप्त; महिलेविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

वरोरा (दि. 29 जून 2026): वरोरा पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मालवीय वार्ड परिसरात कारवाई करून एका महिलेकडून देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी पायल प्रभाकर सोनानी (वय 37, रा. मालवीय वार्ड, वरोरा) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मनिश जगन्नाथ तालेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मालवीय वार्ड येथे छापा टाकण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत पायल सोनानी हिच्या घराची झडती घेतली असता घरातील हॉलमध्ये ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत रॉकेट देशी दारू (संत्रा) या ब्रँडच्या 90 मिलीच्या 12 सिलबंद बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 480 रुपये असून संपूर्ण मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. त्यापैकी एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) नमुना म्हणून वेगळी सीलबंद करण्यात आली.
या कारवाईत पंच म्हणून करण भारत चौरसिया व राहुल सुरेश थुल यांनी सहभाग घेतला. पोलीस पथकात पोलीस अंमलदार जितेश चव्हाण व महिला पोलीस अंमलदार दिशा मिश्रा यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments