वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा : खांबाडा-पोतरा नदीसमोरील चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुषण रमेश वरभे (वय 31) हा हिंगणघाट येथील एपीएमसी मार्केट यार्डमध्ये काम करत होता. दि. 6 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास तो आपल्या ज्युपिटर मोपेड (क्र. MH-32-AF-0876) ने शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवणगाव-खांबाडा परिसरात गेला होता.

दुपारी सुमारे 2 वाजताच्या दरम्यान खांबाडा-पोतरा नदीसमोरील महामार्गावरून जात असताना अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात भुषण वरभे याच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला प्रथम हिंगणघाट येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दि. 10 मे 2026 रोजी रात्री 9.25 वाजता त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळ वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मृताच्या भावाने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.


.        Happy Birthday 🎂 sachin chute

Comments