वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा नगर परिषदेच्या कारभारावर शिवसेनेचा घणाघात; विविध प्रलंबित कामे व गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

वरोरा नगर परिषदेच्या कारभारावर शिवसेनेचा घणाघात; विविध प्रलंबित कामे व गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

बिल पास करण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकानी पैसे घेतले नाही.

वरोरा, दि. 10 जून : वरोरा नगर परिषद प्रशासनाच्या कथित निष्क्रिय व भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी  मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. नगर परिषदेमधील विविध प्रलंबित विकासकामे, निविदा प्रक्रियेतील विलंब, संभाव्य आर्थिक गैरव्यवहार आणि लोकप्रतिनिधींना मिळत नसलेल्या प्रतिसादाबाबत या निवेदनातून गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक खेमराज कुरेकार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका वादग्रस्त कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्याच्या  मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी बिल मंजुरीसाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या चर्चादेखील सुरू होत्या. मात्र, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक कोणत्याही प्रकारच्या तडजोडीत सहभागी नसून त्यांनी सहा हजार रुपयाची रक्कम स्वीकारलेली नसल्याचा दावा पत्रकार परिषदेत व  निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, या विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विधानसभा सभागृहात केली होती. असे असतानाही नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने संबंधित कंपनीचे देयक अदा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय जाजू हॉस्पिटल ते रेल्वे स्टेशन मार्गावरील सजावटीच्या विद्युत खांबांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने शासनाचा निधी परत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 स्वच्छता विभागातील अनेक निविदा उघडण्यास होत असलेला विलंब तसेच बांधकाम विभागातील प्रलंबित निविदा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘नमो उद्यान’ योजनेचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्याप कार्यादेशही देण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे निधी परत गेल्यास त्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

तसेच नगरसेवकांचे दूरध्वनी स्वीकारले जात नसून जनतेच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तक्रार शिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट) तर्फे सांगण्यात आले आहे.

"जनहिताच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड न करता शिवसेना (शिंदे गट) विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावत राहील," असा निर्धारही राजू महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

शिवसेना शिंदे गटातर्फे नगरसेवक खेमराज कुरेकार, शिवसेनेचे नेते राजू महाजन व नगरसेवक यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्याधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले आहे.
..........
जाहिरात

Comments