वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*शिवसेना स्थापना दिनानिमित्त वरोऱ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन*

*शिवसेना स्थापना दिनानिमित्त वरोऱ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन* 

वरोरा, दि. 17 जून : शिवसेना वरोरा विधानसभा व चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर 19 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सिद्धकला लॉन्स, आनंदवन चौक, वरोरा येथे संपन्न होणार आहे.
सध्या चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सहजतेने रक्त उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या निमित्ताने वरोरा विधानसभा क्षेत्रातील युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ऐच्छिक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे व गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा संचालक नितीन केशव मते यांनी सर्व नागरिकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दिनांक 19 जून 2026 
स्थळ-सिद्धकला लॉन, आनंदवन चौक 


Comments