वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावतीत तिनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भद्रावतीत तिनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भद्रावती, दि. 16 जून 2026 : भद्रावती शहरातील एका बंद खोलीत सुरू असलेल्या तिनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 16 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा गस्त अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सचिन खेते यांना गुप्त बातमीदारामार्फत भद्रावतीतील एका इमारतीत काही इसम पैशावर तिनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 15 जून रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास पंचांसह पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान चार जण गोलाकार बसून 52 पत्त्यांच्या संचावर पैशाची हार-जीत लावून तिनपत्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
कार्तिक शरद लेडांगे (23), रा. झाडे प्लॉट, भद्रावती
रोहित बंडुजी ढवस (25), rा. झाडे प्लॉट, भद्रावती
पवन दिवाकर नागपुरे (25), रा. गुरु नगर, भद्रावती
प्रशांत बंडू चुनारकर (32), रा. गवराळा वॉर्ड, भद्रावती
आरोपींकडून रोख रक्कम 16 हजार रुपये व जुगारासाठी वापरण्यात येणारे 52 पत्ते जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 16,050 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments