वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मतदार यादी कामात हलगर्जीपणा; सहाय्यक शिक्षक संदेश चिकाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल .

मतदार यादी कामात हलगर्जीपणा; 

सहाय्यक शिक्षक संदेश चिकाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल .

वरोरा : 75 वरोरा विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा सहाय्यक शिक्षक संदेश चिकाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

नायब तहसीलदार (निवडणूक) शरद पुंडलीकराव मसराम यांनी दिनांक 2 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक, वरोरा यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. ही तक्रार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या निर्देशानुसार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संदेश चिकाटे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवन हे मतदान केंद्र क्रमांक 112 – आनंदवन येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मतदार यादीचे मॅपिंग आणि प्रोजेनी मॅपिंगची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी संबंधित काम विहित मुदतीत पूर्ण केले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. 
कामातील विलंबाबाबत त्यांना अनेक वेळा सूचना देण्यात आल्या. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र, नोटिशीला उत्तर सादर करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय, दिनांक 1 जून 2026 रोजी SIR कामाचा आढावा घेतला असता अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे आढळून आले.
तसेच 18 मे 2026 रोजी आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीलाही संदेश चिकाटे अनुपस्थित राहिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. वारंवार सूचना आणि निर्देश देऊनही त्यांनी निवडणूक संबंधित कामाकडे दुर्लक्ष केल्याने मतदारसंघाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
याप्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 32 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Comments