वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खांबाडा बाजार समितीतील शेडमधून १.७० लाखांची सरकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

खांबाडा बाजार समितीतील शेडमधून १.७० लाखांची सरकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, दि. १२ जून : तालुक्यातील खांबाडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमधून सुमारे ८० पोती सरकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खापरी येथील रहिवासी रुपेश रामाजी चौधरी हे बालाजी अँग्रो इंडस्ट्रीमध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, खांबाडा येथील शेड बालाजी अँग्रो इंडस्ट्रीने भाडेतत्त्वावर घेतले असून त्यामध्ये पांढरकवडा येथील श्याम जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीची सुमारे १८०० क्विंटल सरकी साठवून ठेवण्यात आली होती.
दि. ९ जून रोजी पहाटे सुरक्षा रक्षकाने फोन करून शेडमधील काही सरकीची पोती चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता सुमारे ८० पोती सरकी, किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये, चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजेपर्यंत तो जागा होता. त्यानंतर पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तो चौकीत थांबला होता. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बाजार समितीच्या भिंतीवरून आत प्रवेश करून शेडमधील सरकीची पोती लंपास केल्याचा संशय आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments