वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी कार्यपद्धती निश्चित होणार; १९ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक**आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक*

*कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी कार्यपद्धती निश्चित होणार; १९ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक*

*कोळसाखाणीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची रूपरेषा ठरणार*

*चंद्रपूर : कोळसाखाणीच्या कामकाजामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. कोळसाखाणीमुळे शेतजमिनी, पिके व उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यासंदर्भात आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.*

कोळसा उत्खनन व संबंधित औद्योगिक उपक्रमांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेती उत्पादनात घट, पिकांचे नुकसान, पर्यावरणीय परिणाम तसेच उपजीविकेवर होणारा परिणाम यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाईची पारदर्शक व प्रभावी यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत हा विषय प्रभावीपणे मांडत कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी पोटतिडकीने लावून धरली होती.

१९ जून रोजी होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील कोळसाखाणीग्रस्त भागातील वास्तव परिस्थिती, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसानाचे स्वरूप तसेच नुकसानभरपाईसाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. बैठकीत होणाऱ्या चर्चेच्या आधारे कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची प्रक्रिया, आवश्यक निकष आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याने ही बैठक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कोळसाखाणीमुळे बाधित शेतकरी, नागरिक तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थांच्या समस्या शासनाच्या सर्वोच्च स्तरावर प्रभावीपणे मांडल्या जाव्यात आणि नुकसानभरपाईबाबतची कार्यपद्धती वास्तव परिस्थितीला अनुसरून निश्चित व्हावी, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या सूचना, तक्रारी, मागण्या तसेच कोळसाखाणीमुळे होत असलेल्या नुकसानाची माहिती स्वीय सहायक श्री. संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व महत्त्वाचे मुद्दे १९ जून रोजी होणाऱ्या बैठकीत अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांच्या समक्ष मांडण्यात येणार असून त्यावर आवश्यक कार्यवाहीसाठी प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.

Comments