वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भांडी चमकविण्याच्या बहाण्याने सोन्याची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

भांडी चमकविण्याच्या बहाण्याने सोन्याची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

वरोरा, दि. १० जून : भांडी चमकवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची सोन्याची दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ६.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक ७२१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी नथ्थु साधोजी दडमल (रा. वाल्मिकी वॉर्ड, वरोरा) यांच्या घरी दोन अनोळखी इसम आले. त्यांनी पितळ, तांबे व इतर धातूंची भांडी चमकवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने घेतला आणि हातचलाखी करत तो घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. वरोरा आणि चंद्रपूर परिसरातील २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहरातील एका ठिकाणी दोन दिवस पाळत ठेवून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
या घटनेतील मुख्य आरोपी अटक करण्यात आले आहेत.
मो. आरिफ मो. बरखत अली (वय ४२ वर्ष)
निर्दोष बद्रीप्रसाद गुप्ता
पंकजकुमार सुखदेव शाहा (वय ४३ वर्ष)
सर्व आरोपी हे भागलपूर, बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी वरोरा, बल्लारशाह, सावली, घुग्घुस, राजुरा तसेच इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमाल
१५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ – ₹१.५० लाख
सोन्याचे डोरले, मणी व कानातील दागिने – ₹५० हजार
चार सोन्याच्या अंगठ्या – ₹२.६० लाख
दोन सोन्याचे डोरले – ₹६० हजार
गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली – ₹१ लाख
एकूण जप्त मुद्देमाल : ₹६.२० लाख
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments