वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मेघगर्जनेसह वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; एकार्जुना गावात शोककळा

मेघगर्जनेसह वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; एकार्जुना गावात शोककळा

वरोरा, प्रतिनिधी :

तालुक्यातील एकार्जुना येथील रहिवासी शेतकरी नितीन चंद्रशेखर डूडुरे (वय 40 वर्षे) यांचा वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन डूडुरे हे मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात शेतीकामासाठी गेले होते. सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान परिसरात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वातावरण निर्माण झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात वीज त्यांच्या अंगाला स्पर्श करून गेली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक शेतकरी शेतीसोबतच दुग्ध व्यवसायही करत होते. त्यांच्या मालकीच्या शेतीसह गाई-म्हशींचा व्यवसाय होता. ते कुटुंबातील कर्ते व्यक्ती असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वरोरा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे एकार्जुना गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments