वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक* *पूजा देऊरकर सुवर्णपदकाची मानकरी*

*पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक*

 *पूजा देऊरकर सुवर्णपदकाची मानकरी*

वरोडा : श्याम ठेंगडी

ली जागतिक योगासन स्पर्धा गुजरात मधील अमदाबाद येथे 4 ते 8 जून दरम्यान संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम नोंदविला. पत्रावती तालुक्यातील पूजा देवराव देऊरकर ही योगासन स्पर्धेच्या पहिल्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली.यात योगासनाच्या विविध प्रकारासाठी एकूण ७५ देशांनी सहभाग नोंदविलेला आहे.
 यात ट्विस्टिंग योगासन प्रकारात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पूजा देवराव देऊरकर हिने प्रथम क्रमांक पटकावत भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.
 चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब आहे.

 उल्लेखनीय बाब म्हणजे अत्यंत हलाखीच्या आर्थिक व आरोग्याची तक्रार असून देखील नियमित सराव, जिद्द ,चिकाटी याच्या भरोशावर तिने हे पदक कमावलेले आहे..
      तिच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, सचिव प्रा. तानाजी बायस्कर , सारंग धणेगावकर, स्मिता रेभनकर, शुभांगी डोंगरवार, संतोष शर्मा, डॉ.कुलजीत कौर गिल, कुणाल दातारकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे...

Comments