वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

दिंदोडा प्रकल्पातील सिमेंटची चोरी करून विक्री; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

दिंदोडा प्रकल्पातील  सिमेंटची चोरी करून विक्री; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा | दि. 06 जून 2026

दिडोडा सिंचन प्रकल्पावरील एसएसएफएम (SSFM) कंपनीच्या कॅम्पमधून 40 सिमेंट बॅगा चोरी करून विकल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 जून रोजी रात्री सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल वामनराव जिवतोडे (वय 32), हे एसएसएफएम कंपनीमध्ये स्टोअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. कंपनीकडे दिडोडा प्रकल्पात सिंचनासाठी पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असून कॅम्पमध्ये सिमेंट, लोखंडी साहित्य व इतर बांधकाम साहित्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे.

4 जून रोजी रात्री जिवतोडे हे चालक अजय उपरे व सुपरवायझर अभिजित शेळके यांच्यासह स्टोअरच्या दिशेने जात असताना माढेळीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील बामर्डा फाट्याजवळ एका बोलेरो पिकअप वाहनात सिमेंटच्या बॅगा भरलेल्या दिसल्या. संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करून चौकशी केली असता, संबंधित सिमेंट दिडोडा प्रकल्पावरील कॅम्पमधून खरेदी केल्याचे वाहनातील व्यक्तींनी सांगितले.

यानंतर स्टोअरमध्ये जाऊन पडताळणी केली असता, कंपनीच्या मालकीच्या 40 सिमेंट बॅगा, अंदाजे 11 हजार रुपये किमतीच्या, चोरी करून विकल्याचे समोर आले. या प्रकरणात सुनिल शेरसिंग बाटे (वय 30) व रवी सुरेंद्र कोअरे (दोघेही सध्या दिडोळा प्रकल्प कॅम्प, मूळ रा. गोंदिया) यांची नावे निष्पन्न झाली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



Comments