वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ओव्हरटेकच्या वादातून ट्रॅव्हल्स चालकावर लोखंडी रॉडने हल्ला; गाडीची काच फोडून नुकसान

ओव्हरटेकच्या वादातून ट्रॅव्हल्स चालकावर लोखंडी रॉडने हल्ला; गाडीची काच फोडून नुकसान

वरोरा : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील कोंढा फाटा परिसरात ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून ट्रॅव्हल्स चालकावर लोखंडी रॉडने हल्ला करून वाहनाचे नुकसान केल्याची घटना बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार संजय वसंत कांबळे (वय ४५, रा. सुरक्षा नगर, पांडव वार्ड, भद्रावती) हे ट्रॅव्हल्स व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक MH-34 CV-1577 ने प्रवाशांना घेऊन चंद्रपूरहून नागपूरकडे जात होते. कोंढा फाट्याजवळ पिकअप वाहन क्रमांक MH-34 BZ-5452 ने भरधाव वेगात ओव्हरटेक करत त्यांच्या वाहनाच्या आरशाला धडक दिली.

यानंतर नंदोरी येथील पेट्रोल पंपाजवळ संबंधित पिकअप चालकाने ट्रॅव्हल्स वाहन थांबवून लोखंडी रॉडच्या सहाय्याने वाहनाच्या उजव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत संजय कांबळे यांना हात व खांद्याजवळ दुखापत झाली.

घटनेदरम्यान त्यांच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळ्यांची सोन्याची चैन हरवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच डायल ११२ पथक व वरोरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकावर वरोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments