वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

डीएपी खताच्या तुटवड्याने शेतकरी चिंतेत; तातडीने पुरवठ्याची मागणीकृषी केंद्रांनी आगाऊ रक्कम भरूनही खत उपलब्ध नाही; शेतकरी प्रतिनिधींचे प्रशासनाला निवेदन

डी ए पी खताचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी हवालदिल

कृषी केंद्रांनी अँडव्हान्स रक्कम देऊनही खताचा पुरवठा नाही

 उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकरी प्रतिनिधींचे निवेदन

 वरोरा 3/6/26
      शेतकऱ्यांचा हंगाम सुरू झाला असून बी बियाणे,खते खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे.काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार या अनुषंगाने बळीराजा आपल्या पुर्वतयारीत आहे.
   डी ए पी  डाय अमोनियम फॉस्फेट हे शेतीसाठी अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर रासायनिक खत आहे.सदर खताचा पुरवठा कृषी सेवा केंद्रामार्फत केल्या जातो.परंतु जिल्ह्यात डी ए पी खताचा पुरवठा सध्य स्थितीत होत नसून जिल्ह्याच्या ठिकाणी बंपर स्टॉक असल्याची माहिती आहे.तरीसुद्धा ऐन हंगामात शेतकऱ्यांना डी ए पी खताचा पुरवठा होणे आवश्यक आहे.कृषी केंद्रांनी अँडव्हान्स रक्कम देऊनही हंगामाच्या तोंडावर खताचा पुरवठा होत नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून हि एक शोकांतिका आहे.जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खताचा पुरवठा होण्यासाठी आदेश निर्गमित करावा .खताचा साठा उपलब्ध असतानाही तुटवडा निर्माण केल्या जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.खतांचा पुरवठा झाला तर पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात खत नेऊन सुरक्षित ठेवू शकतात. पावसाला सुरुवात झाली तर शेतामध्ये शेतकऱ्यांना खत नेण्यास अडचण होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खताचा पुरवठा वेळीच व्हावा यासाठी शेतकरी प्रतिनिधींनी 2 जून2026 ला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देताना  जयंत टेमुर्डे वरोरा कृउबा समिती चे उपसभापती तथा संचालक सिडीसिसी बँक चंद्रपूर,  अरुण खारकर अध्यक्ष तालुका सेवा सहकारी संस्था संघटना ,सहसचिव उमेश टोंगे,कोषाध्यक्ष अभिमान काळे,सविता खंगार,आदींची उपस्थिती होती.

Comments