वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

रोटरी क्लब वरोराचा पुढाकार : आयटीआय वरोरामध्ये सेनेटरी पॅड वेंडिंग मशीनचे उद्घाटन

रोटरी क्लब वरोराचा पुढाकार : आयटीआय वरोरामध्ये सेनेटरी पॅड वेंडिंग मशीनचे उद्घाटन

वरोरा, तालुका प्रतिनिधी :
महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य या सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब वरोरा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वरोरा येथे विद्यार्थिनींसाठी सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन बसविले आहे. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआय वरोराचे प्राचार्य श्री. वीरेंद्र पोटदुखे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक तेला उपस्थित होते. सुरुवातीला दीपपूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.

डॉ. विवेक तेला यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी स्वच्छतेचे महत्त्व समजावून आरोग्य जागरूकतेचे आवाहन केले. रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष रोटेरियन योगेश डोंगरवार यांनी क्लबच्या सेवाकार्यांची माहिती देत विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. प्रकल्प प्रमुख सौ. दीपाली माटे यांनी मशीनचे प्रात्यक्षिक सादर करून वापर, देखभाल व फायदे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी इखे सर, दारव्हाणकर सर, रोटेरियन अदनान सद्दीकोट, अभिजित बोथले, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब वरोराच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व आत्मविश्वास वाढीसाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“सुरक्षित आरोग्य, स्वच्छता आणि आत्मविश्वास — प्रत्येक मुलीचा अधिकार!”

Comments