वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावतीत गुळांबा दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड; १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावतीत गुळांबा दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड; १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त


भद्रावती : भद्रावती पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत भंगाराम वॉर्ड परिसरात धाड टाकून गुळांबा दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत तब्बल १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, भंगाराम वॉर्ड येथील महेश विजय मरस्कोल्हे (वय ३०) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गुळांबा दारू तयार करून विक्री करीत आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
झडतीदरम्यान घराच्या मागील बाजूस टिनशेडखाली ठेवलेल्या सहा प्लास्टिक ड्रममध्ये गुळाचा सडवा आढळून आला. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या पाच लिटर गुळांबा दारूचा साठाही जप्त करण्यात आला. पोलिसांनी १,२०० लिटर गुळाचा सडवा व ५ लिटर गुळांबा दारू असा एकूण १,२१,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
जप्त केलेल्या मालाचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (सीए) पाठविण्यात आले असून उर्वरित नाशवंत माल जागीच नष्ट करण्यात आला. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments