वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका युवकाविरुद्ध वरोरा पोलिसांनी कारवाई करून देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार विक्की सदाशिवराव करपे (ब. क्र. 732) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 23 जून 2026 रोजी वरोरा पोलीस स्टेशनचे पथक रोड बंदोबस्त ड्युटीवरून परत येत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, खांबाडा येथील कृष्णा सुखदेव मानकुंमरे (वय 27) हा आपल्या पानटपरीत अवैधरित्या दारूची विक्री करीत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसमक्ष संबंधित पानटपरीवर छापा टाकला. झडतीदरम्यान एका प्लास्टिकच्या पिशवीत रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 एम.एल. क्षमतेच्या 23 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत 920 रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी आरोपीकडे दारू बाळगण्याचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एका बाटलीचा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) राखून ठेवण्यात आला.
आरोपी कृष्णा मानकुंमरे हा अपंग असल्याने त्याला जागेवरच नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments