वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

टोल प्लाझावरील लेनचे 60 हजारांचे नुकसान; भरधाव वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

टोल प्लाझावरील लेनचे 60 हजारांचे नुकसान; भरधाव वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

वरोरा, दि. 06 जून 2026

वरोरा तालुक्यातील सेबळ टोल प्लाझावर भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने टोल लेनला धडक देत मोठे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश अरुण देसले (वय 32), हे सेबळ टोल प्लाझावर टोल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास वाहन क्रमांक MH-49-BZ-9533 हे वाहन वणीकडून वरोरा दिशेने भरधाव वेगाने येत असताना टोल प्लाझावरील लेन क्रमांक 16 ला जोरदार धडकले. या धडकेत लेनचे मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर टोल कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला थांबवून विचारणा केली असता, त्याने नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर कोणतीही भरपाई न दिल्याने टोल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

या धडकेत टोल प्लाझाच्या लेन क्रमांक 16 चे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीवरून वाहन चालक विरेंद्र धर्मदास दमाहे (वय 43, रा. साखरा, ता. वरोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments