वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागरी शेतशिवारात हातभट्टीवर पोलिसांची धाड; 43 हजारांचा मुद्देमाल जप्त.

नागरी शेतशिवारात हातभट्टीवर पोलिसांची धाड; 43 हजारांचा मुद्देमाल जप्त.


वरोरा : वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने नागरी गावाजवळील पोथरा नदीकाठावरील शेतशिवारात हातभट्टी दारू निर्मितीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 43 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 मे 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग व फरार आरोपींचा शोध घेत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, विनोद दादाजी नागपुरे (वय 41, रा. नागरी, ता. वरोरा) हा पोथरा नदीकाठावरील नाल्याच्या खोलगट भागात हातभट्टी लावून मोहाची दारू तयार करीत आहे.
माहितीच्या आधारे पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. तेथे आरोपी हातभट्टीद्वारे मोहादारू गाळताना आढळून आला. पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत 35 लोखंडी पिप्यांमध्ये साठवलेला सुमारे 200 किलो मोहासडवा, 4 लिटर हातभट्टी मोहादारू, लोखंडी पिपे, प्लास्टिक केन, जर्मन वाटे व इतर साहित्य असा एकूण 43,090 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी मोहादारू व मोहासडव्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) जप्त केले. उर्वरित नाशवंत माल पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी विनोद दादाजी नागपुरे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (म.दा.का.) कलम 65 (फ), 65 (ब) व 65 (क) अन्वये वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments