वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

उमरी येथे अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची कारवाई; 32 देशी दारूच्या बाटल्या जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उमरी येथे अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची कारवाई; 32 देशी दारूच्या बाटल्या जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, दि. 29 जून : वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमरी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर वरोरा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 32 नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदिप विठ्ठल मुळे व पोलीस अंमलदार मनोज ठाकरे हे 28 जून रोजी अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत उमरी येथील शामसुंदर विठ्ठल उईके (वय 47, व्यवसाय मजुरी) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत उमरी येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीतून 'रॉकेट देशी दारू संत्रा' या ब्रँडच्या प्रत्येकी 90 मिली क्षमतेच्या 32 बाटल्या, प्रत्येकी 40 रुपये किंमतीप्रमाणे एकूण 1,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीकडे दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करून एक नमुना बाटली सीलबंद करण्यात आली असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी शामसुंदर विठ्ठल उईके याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments