वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात घरातून अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 27 बाटल्या जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोऱ्यात घरातून अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 27 बाटल्या जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.


वरोरा, दि. 29 जून : वरोरा शहरातील कालरी वॉर्ड परिसरात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर वरोरा पोलिसांनी कारवाई करून देशी दारूच्या 27 बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 जून 2026 रोजी पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे व पोलीस कर्मचारी सुखराज यादव हे शहरात अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर प्रकारांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कालरी वॉर्ड येथील नितीन देवीदास न्याती (वय 42, व्यवसाय मजुरी) हा आपल्या घराच्या अंगणातून अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. आरोपीच्या घराच्या अंगणातील प्लास्टिकच्या पिशवीतून प्रत्येकी 90 मिली क्षमतेच्या 'रॉकेट' देशी दारूच्या 27 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 1,080 रुपये असून त्यापैकी एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) नमुना म्हणून सीलबंद करण्यात आली.
घटनास्थळ पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपी नितीन देवीदास न्याती याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments