वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भरधाव आय-20 कारची पल्सरला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव आय-20 कारची पल्सरला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
वरोरा, दि. 11 जून :

वरोरा तालुक्यातील खांबाडा बसस्टॉप चौकात नागपूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9 जून) रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास खांबाडा येथील रहिवासी दिलीप आत्राम व अजय येरेकर हे नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार कंपनीत काम आटोपून पल्सर दुचाकी (क्र. MH-34-CC-2230) ने गावाकडे परत येत होते. दरम्यान, खांबाडा बसस्टॉप चौकाजवळ नागपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या हुंडाई आय-20 कारने (क्र. MH-32-AH-2574) दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून पलटी झाले. अपघातात दुचाकीवरील अजय येरेकर व दिलीप आत्राम हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी सेवाग्राम, वर्धा येथे हलविण्यात आले. अपघातात कारचालकही जखमी झाला असून त्याला वरोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेबाबत विजय मनोहर देठे (वय 27, रा. खांबाडा) यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलीसांनी कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments