वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एक आरोपी ताब्यात, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

वरोऱ्यात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एक आरोपी ताब्यात
कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल.

वरोरा, दि. 18 जून : वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरातील चिकन मार्केटजवळ सुरू असलेल्या सट्टा-पट्टी जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले. या कारवाईत जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. 2571) हे पोलीस हवालदार प्रशांत नागोसे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर व मनोज ठाकरे यांच्यासह पेट्रोलिंग व अवैध जुगारविरोधी मोहिमेवर होते. दरम्यान, मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, यात्रा वॉर्ड येथील चिकन मार्केट परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती नागरिकांकडून आकड्यावर पैसे घेऊन सट्टा-पट्टी जुगार चालवत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे काही लोक घटनास्थळावरून पळून गेले. मात्र सट्टा-पट्टी घेणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
चौकशीत त्याने आपले नाव ताजो अख्तर शेख (वय 27 वर्षे), रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा असे सांगितले. पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून कल्याण सट्टा-पट्टी लिहिलेला कागद, दोन बॉलपेन व 850 रुपये रोख रक्कम असा एकूण 860 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर साहित्य पोलिसांनी पंचनामा करून जप्त केले.
प्राथमिक तपासात आरोपी लोकांकडून आकड्यावर पैसे स्वीकारून सट्टा-पट्टी जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Mumbai Prevention of Gambling Act) कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस करीत असून, शहरातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments