वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा पोलिसांची कारवाई : 1.14 लाखांचा अवैध दारूसाठा व मोपेड जप्त.

वरोरा पोलिसांची कारवाई : 1.14 लाखांचा अवैध दारूसाठा व मोपेड जप्त.

वरोरा, दि. 15 जून 2026 : वरोरा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेत सुमारे 1 लाख 14 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रशांत नागोसे, पोलीस हवालदार संदीप मुळे व पोलीस अंमलदार विशाल हे पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत अवैध जुगार व दारूविक्रीविरोधात गस्त घालत असताना त्यांना 14 तारखेला मुखबिरामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार बोर्डा चौक ते बोर्डा-जामगाव मार्गावर सापळा रचण्यात आला.
दरम्यान, काळ्या रंगाच्या मोपेडवर संशयास्पदरीत्या येणाऱ्या एका व्यक्तीला थांबवून तपासणी करण्यात आली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत मोपेडवरील तीन प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये 120 नग रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की (180 मि.ली.) किंमत सुमारे 30 हजार रुपये तसेच 24 नग सह्याद्री गोल्ड प्रीमियम व्हिस्की (180 मि.ली.) किंमत 4 हजार 320 रुपये असा एकूण 34 हजार 320 रुपयांचा दारूसाठा आढळला.
याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बिना क्रमांकाची सुझुकी ॲक्सेस मोपेड किंमत अंदाजे 80 हजार रुपये जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1 लाख 14 हजार 320 रुपये इतकी आहे.
आरोपीकडे सदर दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दारूच्या नमुन्यांच्या बाटल्या रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) वेगळ्या करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी संतोष देवाजी मडावी (वय 32, रा. मोहबाळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही दारू कोणत्या दुकानातून विकत घेतली.  याचा तपास वरोरा पोलीस करीत आहेत. 

Comments