वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

स्कॉर्पिओच्या स्टेपनीतून एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक, ₹10.37 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्कॉर्पिओच्या स्टेपनीतून एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक, ₹10.37 लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा, दि. ८ जून : वरोरा पोलिसांनी अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत पद्मालय नगर परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी गुलाम गौस सिद्दिकी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ५.५८० ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण ₹१० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पद्मालय नगर परिसरात काही खास व्यक्तींना अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सुमारे ११.३० वाजता छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान एमएच-३४-सीएच-५५ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनाच्या स्पेअर टायर (स्टेपनी) मध्ये लपवून ठेवलेले ५.५८० ग्रॅम एमडी ड्रग्ज पोलिसांना आढळून आले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध मादक पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act, 1985) कलम 8(c) व 21(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, डीबी पथकाचे शरद भस्मे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. वरोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

गुलाम सिद्दिकी हे  शिवसेना शिंदे गट पक्षातील कामगार सेनेचे नेते आहे. ड्रग्स त्यांच्या गाडीच्या स्टेफनी मध्ये मिळाले आहे अशी माहिती आहे. त्यामुळे राजकीय कुरखोडी असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधातील आजूबाजूचे सीसीटीव्ही कव्हरेज सुद्धा पोलीस तपास करीत आहे.
..........
जाहिरात 


Comments