वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

किरकोळ वादातून हल्ला; विट मारून युवक जखमी, दुचाकीचेही नुकसान

किरकोळ वादातून हल्ला; विट मारून युवक जखमी, दुचाकीचेही नुकसान

वरोरा : कॉलरी वार्ड परिसरात किरकोळ वाहन वादातून दोन युवकांनी एका मासेविक्रेत्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या मारहाणीत जखमीच्या दुचाकीचेही नुकसान झाल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक विठ्ठल रूयारकर (वय 41), रा. आझाद वार्ड, वरोरा हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक 25 मे रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या दरम्यान ते व त्यांचा मित्र बालाजी गजानन नान्ने हे दोघे मोटारसायकलने बालाजी नान्ने यांच्या घरी जेवणासाठी जात होते.
दरम्यान, कल्याणेश्वर बजरंगबली मंदिरासमोर कॉलरी वार्ड येथे समोरून येणारा अल्ताफ अन्सारी हा मोटारसायकल घसरून खाली पडला. त्यानंतर त्याने बालाजी नान्ने यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यावेळी कार्तिक रूयारकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता अल्ताफ अन्सारी याने त्यांच्या गालावर थपडा मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर अल्ताफ अन्सारी याने फोन करून समीर पठाण याला घटनास्थळी बोलावले. काही वेळाने दोघेही बालाजी नान्ने यांच्या घराजवळ पोहोचले. त्यावेळी कार्तिक रूयारकर हे आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवर बसले असताना अल्ताफ अन्सारी याने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली व डोक्यावर विट मारल्याने ते जखमी झाले. तसेच समीर पठाण यानेही मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत अॅक्टिव्हा दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याने वाहनाच्या उजव्या बाजूच्या पॅनलचे नुकसान झाले असून सुमारे 5 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी अल्ताफ अन्सारी व समीर पठाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ, धमकी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार करीत आहेत.

Comments