वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भाचाला वाचवताना मामाचा दुर्दैवी मृत्यू; अवैध रेती उत्खननावरून संताप, चौकशीची मागणी

भाचाला वाचवताना मामाचा दुर्दैवी मृत्यू; अवैध रेती उत्खननावरून संताप, चौकशीची मागणी

वरोरा-चेतन लूतडे 28/5/2026

 तालुक्यातील केळी गावाजवळ वना नदी पात्रात घडलेल्या दुर्दैवी घटनेत भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कोळसे (वय 35, रा. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट) हे इतर दोघांसह नदीपात्रात तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून जात होते. यावेळी नदीतील खोल पाण्याच्या खड्ड्यात भाचा अडकल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी राहुल कोळसे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, अंदाजे 40 फूट खोल खड्ड्यात ते स्वतःच अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे हा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात राहुल कोळसे यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच शेकापूर (बाई) आणि केळी परिसरातील नदी घाटांमध्ये 3 ते 4 किलोमीटरपर्यंत झालेल्या अवैध रेती उत्खननाचे मोजमाप करून शासनाचा महसूल वसूल करावा, चोरीचे रेती साठे व यंत्रसामग्री जप्त करावी आणि शेकापूर (बाई), शेकापूर (येळी), कोल्ही, खेकडी, बामर्दा, दारोडा, घाट सावली यांसह अन्य अवैध रेती घाट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

.         राहुल कोळसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 




Comments