वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम यशस्वी


पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम यशस्वी

चेतन लूतडे 26/5/26

वरोरा, ता. २५ मे – वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर समिती, टेंमुर्डा यांच्या वतीने आयोजित बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. हे शिबिर सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आले असून, यावर्षी शेकडो बालकांचा सहभाग होता.

१६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. १६ ते २५ मे २०२४ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समजावून देत, त्यांच्या जीवनमूल्यांचा अभ्यास करून सद्गुणांची पेरणी करण्यात आली.
शिबिराचे आयोजन जनार्दन देठे (प्रमुख मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माणिक डुकरे (व्यवस्थापक), शामराव काळे (अध्यक्ष), हितेश घुगल (उपाध्यक्ष), मनोज ढोके (सचिव) तसेच नियोजन प्रमुख आशिष माणुसमारे, शैलेश खिरटकर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना, सामुदायिक ध्यान, योग व प्राणायाम, भक्तिसंगीत, वाद्य प्रशिक्षण (टाळ, खंजिरी, तबला, हार्मोनियम), भजन गायन, संत वाङ्मय अभ्यास, मैदानी खेळ (लाठी-काठी, कुस्ती, कराटे, मल्लखांब, लेझीम) या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments