वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतकऱ्याच्या गोठ्याला आगजवळपास चार लाखाचे नुकसान आल्फर येथील शेतशिवारातील घटना

शेतकऱ्याच्या गोठ्याला आग

जवळपास चार लाखाचे नुकसान

 आल्फर येथील शेतशिवारातील घटना

 वरोरा
     तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एक बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतिउपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाले असून सदर घटना २०मे २०२६ ला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.
    आल्फर येथील पीडित शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी ,व शेतिउपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा,आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागली हि बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी पीडित शेतकऱ्याला दिली.तेव्हा शेतकरी शेतात गेला तर सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले.वरोरा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.जवळपास शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे.घटनास्थळाचा पंचनामा तलाठी यांनी केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.

    ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीचे कवेत
   शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होणार याचवेलेस बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Comments