गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

वॉर्डातील कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा अनोखा निषेध

वॉर्डातील कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा अनोखा निषेध

चेतन लूतडे. 8/5/26


वरोरा : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचून राहिल्याने आणि नाल्यांची साफसफाई होत नसल्याच्या मुद्द्यावरून नगरपालिकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या कार्यालयात नालीतील घाण टाकून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला.
याबाबत बोलताना नगरसेवक राज खंडारे यांनी सांगितले की, प्रभागातील कचरा व नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न अनेक वेळा सभागृहात मांडण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेच्या कार्यालयात आंदोलनकर्त्यांनी नाल्यातील घाण आणून टाकत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पुढील कारवाईबाबत पोलीस प्रशासन तपास करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर शहरात विविध चर्चा रंगू लागल्या असून, “सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच प्रशासनाकडे अशा पद्धतीने न्याय मागावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्यांसाठी कुठे दाद मागायची?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


Comments