वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बोर्डा चौकात अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची कारवाई42 निप्पा देशी दारूसह आरोपी ताब्यात; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

बोर्डा चौकात अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची कारवाई
42 निप्पा देशी दारूसह आरोपी ताब्यात; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

वरोरा : वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बोर्डा मेन चौक परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत 42 नग देशी दारूच्या निप्पा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 मे 2026 रोजी सायंकाळी 6.30 ते 7.00 वाजताच्या सुमारास पोहवा सुखराज यादव, पोहवा अमोल नवघरे व पो.अं. महेश गावतुरे हे वरोरा शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मुखबिराकडून माहिती मिळाली की, बोर्डा मेन चौक येथे नागपूर-चंद्रपूर हायवे लगत असलेल्या एका शटरच्या टपरी दुकानात अवैध देशी दारूची विक्री सुरू आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. तेथे रंजित ओमकार फोन्डे (वय 40 वर्ष) रा. फुलगाव, जि. वर्धा ह.मु. हनुमान नगर, यात्रा वॉर्ड, वरोरा याच्या टपरी दुकानाची तपासणी केली असता एका कापडी पिशवीत 90 एमएलच्या 42 सीलबंद देशी दारूच्या निप्पा आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 1 हजार 680 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडे दारू बाळगण्याचा किंवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
............

Comments