लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**

**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**

*चंद्रपूर:*अंकूश अवथे 

 "सहा महिन्यांचे मानधन थकले आहे, आम्ही आमचे कुटुंब पोसायचे कसे?" असा संतप्त सवाल करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार धडक दिली. राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो महिला कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.
ऑक्टोबर २०२५ पासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन प्रलंबित असल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनात प्रामुख्याने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करणे, आणि ७० वर्षांवरील लाभार्थी नोंदणी यांसारख्या ऑनलाइन कामांसाठी अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक पुरवणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सुविधा मिळत नाही, तोपर्यंत 'मात्रा ऍप'वरील कामाची सक्ती करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास व दिलेल्या विविध मागण्याची पुर्तता न झाल्यास २१ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन आणि बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात कॉ. निकिता नीर, सुहासिनी वाकडे, ममता भीमटे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments