वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या  रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सरकारतर्फे ठेकेदारा मार्फत रोडचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करणे, संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणे आणि रस्ता दर्जेदार पद्धतीने नव्याने तयार करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलजई व आमडी परिसरातील नागरिकांनी दिला असून, पुढील परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments