1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

बातमी:

वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सरकार तर्फे ठेकेदारा मार्फत रोड बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करणे, संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणे आणि रस्ता दर्जेदार पद्धतीने नव्याने तयार करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलजई व आमडी परिसरातील नागरिकांनी दिला असून, पुढील परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments