1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

चंद्रपूर जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितांवर मोठी कारवाई; १६ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, ३ कायमस्वरूपी रद्द

चंद्रपूर जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितांवर मोठी कारवाई; १६ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, ३ कायमस्वरूपी रद्द

बातमी: वरोरा 29/4/26
चंद्रपूर : जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्रीमध्ये करण्यात येणाऱ्या अनियमितांची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे. २४ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील १६ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले, तर ३ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय १२ कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठा व विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा गुणनियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली. तपासणीत अनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत तसेच विक्री नोंदींमध्ये अनियमितता आढळून आली.
या प्रकरणी संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी प्रक्रिया पार पडली. प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने १६ कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत साठेबाजी व खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. खत विक्रीत किंवा इतर कृषी निविष्ठांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
परवाने निलंबित कृषी केंद्रे:
श्री अॅग्रो ट्रेडर्स (दुर्गापूर), शिव कृषी केंद्र (वरोरा), कल्पना कृषी केंद्र (वरोरा), आदर्श कृषी केंद्र (जिबगाव-सावली), धाईत कृषी केंद्र (निफंद्रा-सावली), साई कृषी केंद्र (सावली), आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था (गिरगाव-नागभीड), देशमुख कृषी केंद्र (मांगली-नागभीड), सेवा सहकारी संस्था (पळसगाव-नागभीड), प्रभु कृपा कृषी केंद्र (मेंढा-नागभीड), ठेंगरे कृषी केंद्र (पिंपळगाव-ब्रम्हपुरी), विनोद कृषी केंद्र (पिंपळगाव-ब्रम्हपुरी), पवन कृषी केंद्र (भद्रावती), समर्थ अॅग्रो एजन्सी (गवराळा-भद्रावती), पाथरी सेवा सहकारी संस्था (पाथरी-सावली), गणेश कृषी केंद्र (बेंबाळ-मुल).
परवाने रद्द कृषी केंद्रे:
तिरुमला अॅग्रो एजन्सी (कोरपना), सेवा सहकारी संस्था (गेवरा बुज-सावली), कास्तकार कृषी केंद्र (व्याहाड खु.-सावली).
.........................

Comments