वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराला नवनिर्मित जिल्ह्याचे मुख्यालय बनवण्याची मागणी स्थानिक आमदार करण संजय देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

आमदार देवतळे यांनी मंत्री बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व भद्रावती, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी जामणी तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, अशी विनंती केली आहे. या सर्व तालुक्यांसाठी वरोरा हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती व सर्वात सोयीचे ठिकाण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
वरोरा शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक असून जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये येथे पूर्ण होत असल्याचे आमदार देवतळे यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन व इमारती उपलब्ध असून फारसा खर्च न करता कमी वेळात प्रशासकीय यंत्रणा उभारता येईल, असेही त्यांनी नमूद केले. वरोरा शहराला जागतिक कीर्तीचे आनंदवन व ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांसारखे वैशिष्ट्य लाभले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रशासकीय सोयीसाठी व प्रस्तावित तालुक्यांतील नागरिकांच्या सोईसाठी हा नवीन जिल्हा अत्यंत आवश्यक असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments