वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

 पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील पुनर्वसन झालेल्या गावांपैकी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत महसूल दर्जा मिळवून शेतकऱ्यांच्या हाती सातबारा पोहोचविणारे रानतळोदी हे पहिले गाव ठरले आहे. या गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित विशेष शिबिरात सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले.

स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील मुख्यमंत्री हॉलमध्ये दिनांक १४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्री. कोटकर, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे श्री. कडू गुरुजी, जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा वरोराचे माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई, उपविभागीय अधिकारी श्री. गुळाणे, नायब तहसीलदार श्री. बर्डे व भूमी अभिलेखाचे श्री. पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते रानतळोदी येथील शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण करण्यात आले.
यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उर्वरित सातबाऱ्याचे वितरण रानतळोदी गावात शेख जैरुदीन छोटूभाई, सरपंच सौ. मळावी आणि उपसरपंच कैलास कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, तालुका व जिल्ह्यातील विविध पुनर्वसन गावांना महसूल दर्जा मिळावा, त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि गावांच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेख जैरुदीन छोटूभाई यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी पळसगाव व कोळसा या पुनर्वसित गावांनाही महसूल दर्जा मिळवून देण्यात यश आले होते.

या कार्यक्रमात बोलताना शेख जैरुदीन छोटूभाई यांनी जिल्ह्यातील इतर पुनर्वसन गावांकडे लक्ष वेधले. "जिल्ह्यातील उर्वरित पुनर्वसन गावांमधील गोरगरिबांच्या समस्यांचे तातडीने निवारण करून त्यांना न्याय दिला नाही, तर पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

......

Comments