वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा


मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा
चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची.

राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनिवारी) या परिसरात येऊन या रस्त्याचे उद्घाटन करणार असल्याचे समजताच प्रशासकीय यंत्रणा अचानक सक्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर डांबरीकरणाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी मशिनरी कामाला लागली आहे. हे पाहून एका स्थानिक युवकाने कंत्राटदारासमोर जाऊन सवाल केला, "आत्तापर्यंत इथे माणसं राहत नव्हती का? आम्ही पंधरा वर्षे या रस्त्याने कसं जगलो, याचं कुणाला काही देणंघेणं नव्हतं?"

स्थानिक युवकांनी या कामाच्या दर्जावर देखील तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी काम उरकण्याच्या निक्षून सूचना असल्याने कंत्राटदाराने दर्जाला तिलांजली दिली आहे. कामगारांकडून घाईघाईत डांबर टाकले जात असून त्यामुळे काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. निकृष्ट बांधकामाबद्दल प्रश्न विचारला असता, कंत्राटदाराने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता थेट पळ काढला.

ग्रामस्थांची मागणी आहे की, केवळ उद्घाटनासाठी नव्हे, तर ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता दर्जेदार रस्ता बांधून द्यावा. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून कामाची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक युवक संघटनेने केली आहे.
......................

Comments